नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळा बाजार समितीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी प्रहार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांद्याचे लिलाव बंद पाडून बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोरच रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी नाफेडच्या दराप्रमाणे कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले असतांना आज देवळा बाजार समितीमध्ये नाफेडचे अधिकारी न आल्याने शेतकरी संतप्त झाले.
यावेळी शेतक-यांनी सांगितले की, खरं तर शेतक-यांची नाफेडकडून कांद्याची खरेदी करण्याची मागणी नव्हती. केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी होती. पण, तसे न करता नाफेडच्या नावाने शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचे कट रचला जात आहे. असा आरोप आंदोलक शेतकऱयांनी केला. कांदा निर्यात शुल्क तातडीने मागे घेण्याची आग्रही मागणी आंदोलक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
devala kanda andolan
Nashik District Deola Farmer Agitation Onion Issue