नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. अनेक धरणे भरल्यामुळे त्यातून पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी, नद्यांना पूर आला आहे. काही रस्ते आणि पूलही पाण्यात गेले आहेत. या पावसामुळे शेतपिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील ६ धरणे १०० टक्के भरली आहेत. गंगापूर धरण समुहात सध्या ८९ टक्के जलसाठा आहे. गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच आहे. पालखेड धरणसमुहात ८८ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे येथील अनेक धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. गिरणा खोऱ्यातही दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील धरणसाठा ७५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.
जिल्ह्यातील धरणसाठा असा,
धरण साठा दलघफुमध्ये आणि टक्केवारी अशी
गंगापूर ५३५३… ९५
दारणा ६८८३…९६
काश्यपी १४४०…७८
गौतमी गोदावरी १४१३… ७६
पालखेड ५३३…८२
वाघाड २२९४…१००
करंजवण ४४४३…८३
भावली १४३४…१००
मुकणे ६११४…८४
वालदेवी ११३३….१००
नांदूरमध्यमेश्वर २४८…९६
आळंदी ८१६…१००
चणकापूर २१८७…९०
पुनद ११९४….९१
हरणबारी ११६६….१००
एकूण ४९४५८… ७५
Nashik District Dam Water Storage September 2023