नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २७ जुलै अखेर ४४ टक्के साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ६२ टक्के तर समुहात ४९ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, २७ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये २८ टक्के वाढ झाली आहे.
भावली धरण ओव्हरप्लो झाले आहे. त्याचबरोबरच दारणा धरणाचा साठाही ७८ टक्के आहे. तर तीन ते चार धरणाचा साठा हा ५० टक्केहून अधिक आहे. तर इतर धरणा मात्र ५० टक्केपेक्षा कमी साठा आहे. गेल्या पावसाळयात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला. पण, आता वाढ होत आहे. अजूनही काही ठिकाणी दमदार पाऊस नाही. त्यामुळे य़ेथील धरणाची पातळी कमी आहे. पुढील काळात ही धरणे भरण्याची शक्यता आहे.