नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये १७ ऑगस्ट अखेर ६५ टक्के साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ९१ टक्के तर समुहात ७८ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, ४१ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ४४ टक्के वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील भावली, हरणबारी, केळझर, नांदुरमधमेश्वर ही चार धरणे ओव्हरप्लो झाली आहे. त्याचबरोबरच गंगापूर, पुणेगाव, दारणा, मुकणे, कडवा या पाच धरणात ७५ टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. तर ५० टक्केहून अधिक पाणीसाठा ९ धरणात आहे. त्यात काश्यपी, गौतम गोदावरी, आळंदी, पालखेड, करंजवण, वाघाड, भोजापूर, चणकापूर, पुनद यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओझरखेड व गिरणा धरणासाठा साठा ५० टक्केहून कमी आहे. तर माणिकपुंज, नागासाक्या, तिसगाव या तीन धरणाचा साठा शुन्य टक्के आहे.
गेल्या पावसाळयात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला. पण, आता वाढ झाली आहे. पण, पावसाने पुन्हा दडी मारल्याने पुढील काळात दमदार पाऊस झाला तर ही धरणे भरण्याची शक्यता आहे.
Nashik District Dam Water Storage rainfall August