नाशिक – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपर्यंत एकूण ८० टक्के असलेला जलसाठा आता थेट ८९ टक्क्यांवर गेला आहे. अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. तर, यंदा नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही, हे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये आजचा पाणीसाठा असा