नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ३० जून अखेर २१ टक्के साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा आहे. गेल्या पावसाळयात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला आहे. आता पावसाला सुरुवात झाली असली तरी अजूनही दमदार पाऊस नाही. त्यामुळे जोपर्यंत जोरदार पाऊस होत नाही. तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.