नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ७ ऑगस्ट अखेर ६१ टक्के साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ८७ टक्के तर समुहात ७२ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, ३१ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ४१ टक्के वाढ झाली आहे.
भावली, हरणबारी, वालदेवी, केळझर ही चार धरणे ओव्हरप्लो झाली आहे. त्याचबरोबरच गंगापूर, दारणा, कडवा, या धरणात ७५ टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. पालखेड, पुणेगाव,मुकणे, नांदूरमदमेश्वर, चणाकपूर, पुनद या धरणातही साठा वाढला आहे. तर १३ धरणात मात्र ५० टक्केपेक्षा कमी साठा आहे. गेल्या पावसाळयात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला. पण, आता वाढ होत आहे. अजूनही काही ठिकाणी दमदार पाऊस नाही. त्यामुळे य़ेथील धरणाची पातळी कमी आहे. पुढील काळात ही धरणे भरण्याची शक्यता आहे.
nashik district dam position water storage