नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भावली धरण ओव्हरप्लो झाल्यानंतर हरणबारी धरण १०० टक्के भरले आहे. बागलाण मधील पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पहाटे पासून धरणाच्या सांडव्या वरुण पाणी मोसम नदीपात्रातून वाहू लागले. हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे मोसम नदीकाठच्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे. तर मोसम नदीतून वाहणारे पाणी पुढे गिरणा धरणात पोहचत असल्याने गिरणा धरणाच्या पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २९ जुलै अखेर ४९ टक्के साठा होता त्यात आता थोडी वाढ झाली आहे. गंगापूर धरणाचा साठा ७४ टक्के तर समुहात ५८ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, २९ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये २८ टक्के वाढ झाली आहे.
भावली धरण ओव्हरप्लो झाल्यानंतर जिल्हयातील दुसरे हरणाबारी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्याचबरोबरच गंगापूर, दारणा, कडवा, हे धरण ७५ टक्के भरले आहे. पालखेड, पुणेगाव, मुकणे, नांदूरमदमेश्वर, चणाकपूर, पुनद या धरणात ५० टक्केहून अधिक साठा आहे. तर १५ धरणात मात्र ५० टक्केपेक्षा कमी साठा आहे. गेल्या पावसाळयात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला. पण, आता वाढ होत आहे. अजूनही काही ठिकाणी दमदार पाऊस नाही. त्यामुळे य़ेथील धरणाची पातळी कमी आहे. पुढील काळात ही धरणे भरण्याची शक्यता आहे.