नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक यंदा होत आहे. सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामांकन पत्र वाटप व स्वीकृती प्रक्रिया आजपासून (३० मार्च) सुरू झाली आहे. या अर्जांची छाननी उद्या (३१ मार्च) दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड मनीष लोणारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच पदाधिकारी आणि तीन निवड समिती सदस्य पदांकरिता केवळ एकेकच अर्ज आले. त्यामुळे या पदांसाठी बिनविरोध निवडणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यात चेअरमन : धनपाल (विनोद) शाह.
सेक्रेटरी : समीर रकटे, खजिनदार : हेमंत देशपांडे, जॉइंट सेक्रेटरी : योगेश ( मुन्ना ) हिरे आणि चंद्रशेखर दंदणे, निवड समिती सदस्य : सतीश गायकवाड, तरुण गुप्ता आणि फय्याज गंजीफ्रॉकवाला यांचा समावेश आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासद एकूण २७६० असून ६२ क्लब सभासद आहेत.
दहा कार्यकारिणी सभासद पदांसाठी मात्र पुढीलपप्रमाणे एकूण सतरा जणांनी नामांकन पत्र भरले आहे. ही नावे अशी
१-महेश मधुकर मालवी .
२-हेतल खेमचंदभाई पटेल .
३-राघवेंद्र जयंतकुमार जोशी .
४-विलास विश्वनाथ झेंडफळे.
५-मेहेन्द्र कारभारी आहेर .
६-शिवाजी भीमाजी उगले .
७-रुफ मोहम्मद पटेल .
८-अनिरुद्ध विनायक भांडारकर .
९-निखिल रामनारायण टिपरी .
१०-जगन्नाथ चंदु पिंपळे.
११-विनायक परशुराम ( पुरुषोत्तम ) रानडे .
१२-संजय परीक्षित परिडा .
१३-बाळासाहेब उमाजी मंडलिक .
१४-महेश देवबा भामरे .
१५- नीलेश दिलीपराव चव्हाण .
१६-गणेश शिवाजीराव कुशारे .
१७-योगेश कमोद .