इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या सन २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठीची निवडणूक शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत अन्नपूर्णा हॉल, नंदनवन लॉन्स, मते नर्सरी रोड, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. मनीष लोणारी हे काम पाहणार आहेत.
तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ४ मे रोजी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान पॅव्हेलियन हॉल,गोल्फ क्लब त्र्यंबक रोड, नाशिक येथे होणार आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासद एकूण ३११२ असून ७६ क्लब सभासद आहेत.