नाशिक( इंडिया दर्पण वृत्तसेवा): येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व वाहनतळ इमारतीचा भुमीपूजन समारंभ शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय, नाशिक येथे सकाळी 9.30 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
या समारंभास उच्च न्यायालय, मुंबईचे मुख्य न्यायमुर्ती श्री. चंद्रशेखर हे अध्यक्षस्थानी असून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, न्यायमुर्ती सारंग कोतवाल, न्यायमुर्ती जितेंद्र जैन व न्यायमुर्ती अश्विन भोबे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक श्रीचंद जगमलानी व वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी केले आहे.