चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे आज सकल हिंदू बांधवांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजपा आमदार नितेश राणे उपस्थित होते. त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता निघालेल्या या मोर्चात हजोरोंच्या संख्ये चांदवड तालुक्यातील विविध गावातील तरुण, तरुणी महिला, पुरुष सहभागी झाले होते. राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतराचा कायदा करावा या मागणी साठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
चांदवड शहरातील अनेक भागात फिरुन हा मोर्चा चांदवड बाजार समितीत आल्यावर त्या ठिकाणी केवळ कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला स्टेजवर बोलविण्यात आले नाही. केवळ वारकरी संप्रायदायच्या दोघा प्रतिनिधी व हिंदुत्वाची ज्वलंत तोफ समजणा-या हर्षदा ठाकूर यांना बोलावण्यात आले. त्यांनी लव्ह जिहाद व हिंदुत्वाचे विचार मांडले. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत सभेच्या ठिकाणी बैठक मांडली.
सभा संपल्यानंतर नितेश राणे यांची पत्रकार परिषद झाल्यावर त्यांनी लवकरच लव्ह जिहादचा कायदा कडक करु असे आश्वासन देत येत्या अधिवेशनात कायदा पास होईल असे सांगितले. चांदवड मध्ये १५ ऑगस्टला एका टोल नाक्यावरील कर्मचा-याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर चांदवड तालुक्यात मोठा गदारोळ होऊन संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन झाले होते. तर चंद्रेश्वर मंदीराच्या डोंगरावर कबरीवर शाल चढविल्या जात असल्याच समोर आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. यावेळेस संपूर्ण तालुक्यात जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर आज हजारोंच्या संख्येने सकल हिंदु समाजाचा जनआक्रोश मोर्चा काढला.
Jan Akrosh Morcha demands that Chandwad make a law on love jihad and conversion
Nashik District Chandwad Janaksrosh Morcha Love Jihad Protest Agitation