नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्यांमध्ये सध्या कांद्याचे लिलाव बंद आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. आता यासंदर्भात मोठा निर्णय झाला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यासंदर्भात मध्यस्थी केली आहे. ती यशस्वी झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत अखेर सन्मानजनक तोडगा निघाला आहे. त्यानुसार, येत्या गुरुवारपासून (२४ ऑगस्ट) कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. म्हणजेच तब्बल ३ दिवसांच्या संपानंतर आता कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सभापती बाळासाहेब शिरसागर, उपसभापती गणेश डोमाडे ,संचालक मंडळ व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी आज लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळी साडेदहा वाजेपासून व्यापारी वर्गाची दीर्घकाळ चर्चा केली. त्यानंतर बाजार समितीचे सभापती बाळासाहेब शिरसागर यांच्या प्रयत्नांना यश आले. उद्यापासून लासलगाव बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू होणार आहेत. लासलगाव बाजार समितीचे संचालक बाळासाहेब दराडे प्रवीण कदम ,रमेश पालवे या परिवाराच्या वतीने ओम प्रकाश राका ,मनोज जैन,नितीन जैन यांच्यासह या परिवार उपस्थित होते.
लासलगावचे कांदा बाजार आशिया खंडातील सर्वात मोठी जास्त बाजारपेठ आहे. लासलगाव येथील बाजार समितीच्या लिलावात जे भाव जाहीर होतात त्यावरच राज्यात देशात आणि परदेशी देखील बाजार भाव घोषित होत असतात. त्यामुळे अन्य बाजार समितीच्या तुलनेमध्ये लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे होते. काल सभापती बाळासाहेब शिरसागर यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली. लासलगाव बाजार समिती कांदा लिलाव उद्या सुरू होणार असले तरी विंचूर बाजार समितीचे व्यवहार झालेले आहेत. उद्यापासून शेतकरी वर्गाने आपला कांदा शेतीमाल विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाने कांदा निर्यातीवर ४०टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतांना शेतकरी व व्यापारी यांना कुठलीही वेळ न दिल्याने नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला. यासंदर्भात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग जिल्हा उपनीबंधक फयाज मुलाणी म्हणाले की, बाजार समित्यांमधील कांदा शेतमाल लिलाव व इतर शेतीमालाचे लिलाव चालू राहतील याची दक्षता घ्यावी. आवश्यकता असल्यास म महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ व त्याखालील नियम, १९६७ मधील तरतूदीनुसार बाजार समितीने अशा व्यापान्यांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी असे बाजार समित्यांस निर्देशित करावे असे बाजार समितस आदेश दिले होेते.
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात मूल्य नाशिक जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांवरील लिलाव बेमुदत बंद ठेवले होते. त्याचबरोबर विविध संघटनांनी या निर्णयाविरुध्द आंदोलने केली. मंगळवारी घडलेल्या या सर्व घडामोडीनंतर कांदा व्यापारी असोशिएशनची आज बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चेनंतर कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही कांदा व्यापारी बाहेरगावी असल्यामुळे उद्यापासून लासलगाव कांद्याचे लिलाव सुरु होणार आहे. तर उप बाजार आवार निफाड येथे आजपासून लिलाव सुरु होणार आहे. तर उपबाजार विंचूर येथे कांदा लिलाव सुरु झाले आहे.
Onion auction will start from Thursday
Nashik District APMC Lasalgaon Onion Auction Traders Decision