नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, येवला, चांदवड, नांदगाव, मालेगाव, कळवण, बागलाण, आधी तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सिन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या गटाचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी पत्राव्दारे महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्याकडे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, चालू वर्षी राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडलेला आहे. मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मात्र पावसाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड येवला चांदवड नांदगाव बागलाण मालेगाव आणि कळवण तालुक्यांमध्ये पर्जन्यमान नसल्याने खरीप हंगामाची सुरुवात देखील झालेली नाही. तसेच पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण होणार आहे.
सुरुवातीच्या काळातील अत्यल्प पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र दुपारी पेरणी करून सुद्धा करू पुन्हा नष्ट झाल्याने महागाई महागाचे बी बियाणे चा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे.
अशा परिस्थितीत जिल्ह्यातील धरणाच्या पाण्याचे साठी देखील अतिशय अल्प असल्याने पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे. तरी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड येवला चांदवड नांदगाव मालेगाव कळवण बागलाण आधी तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा छावणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावा. तसेच शेतकऱ्यांची विज बिल माफी कर्ज माफी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सीमा करून आवश्यक त्या सवलती तात्काळ जाहीर करव्यात अशी मागणी केली आहे.
Amadar Sinner MLA manikrao kokate
Nashik District 7 Talukas Drought Rain Water Scarcity