दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओझरखेड धरण परिसरात नाशिक – वणी मार्गावर दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. भारत किसन चौधरी (३१, रा, कोल्हेर ता. दिंडोरी ), मयुर चिंतामण भोये (१८, रा, कोल्हेर ता. दिंडोरी) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. तर विकी भरत धूम (२८ रा. कोल्हेर ता. दिंडोरी) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातातीत तिन्ही दिंडोरीहून वणीकडे मोटारसायकवर जात होते. पण, कृष्णगाव शिवारात ही मोटरसायकल घसरल्याने हा भीषण अपघात झाला. यात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघानंतर सर्वांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, यातील दोघे मृत झाल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी तपासल्यानंतर सांगितले. यातील जखमीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनखाली पो. काँ. सोनवणे करत आहे.