दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीचे आमदार व विधानसभेचे उपसभापती ना. नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदार संघातील अहिवंतवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जिरवाडे आदिवासी बहुल गावाअंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करून रस्ता दुरुस्त होत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी वैतागून रस्त्यावरील चिखलातच भात लागवड करून आपला संताप व्यक्त करत निषेध केला. रस्त्याचे तातडीने काम करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.
दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे या पंचवार्षिकमध्ये अडीच वर्षे सत्तेत होते. त्यांनी विधानसभेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी मिळाली. आताही ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबरोबर सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या मतदार संघात संतप्त नागरिकांनी केलेले हे आंदोलन लक्षवेधी आहे. या प्रश्नाकडे त्यांनी गांभीर्याने बघायला हवे. दिंडोरीच नाही तर सगळीकडे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. पण, प्रशासना त्याकडे गांभीर्याने बघत नाही. शहरात तीच अवस्था आहे. तर ग्रामीण भागातील चित्र भयावह आहे. या रस्त्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
nashik dindori rural bad road condition citizen agitation
Deputy Speaker Narhari zirwal