नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधवा प्रथा बंद करु…माय माऊलीचा सन्मान करु! हे अहवान करत आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्यासंकल्पनेतुन भगुर शहरात विधवा महिलांसोबत वटपोर्णीमा साजरी करण्यात आली.
विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय, महाराष्ट्र सरकारने पुरोगामी पाऊल उचलले आहे. याला प्रतिसाद देत वटपोर्णीमेच्या दिवशी भगूर शहरात विधवा महिलांचा हळद-कुंकू लावून,साडी चोळीने सन्मान करण्यात आला. तसेच, त्यांच्या हस्ते वट वृक्षाचे रोपण करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून विधवा प्रथा बंद करण्याचे आवाहन भगूर मधील कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले. यावेळी जिजाबाई जाधव, आर्चना पारछा, प्रियंका शेलार, सुलोचना मोरे, अनिता गोडसे, मंदाबाई गायकवाड, संगिता कोळेकर, सिंधुबाई इंगळे यांच्यासह २००हून अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला.
प्रेरणा बलकवडे बोलताना म्हणाला की, आपल्या रूढी परंपरेनुसार नवरा गेल्यावर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे, सर्व शुभकार्यातून लांब ठेवणे या गोष्टी केल्या जातात. फक्त एक व्यक्ती गेली म्हणून स्त्रीला असंसमाजात ‘विधवा’ हा स्टॅम्प मारणे व सार्वजनिकरीत्या चुकीचे आहे. विधवा महिलांना इतर महिलांप्रमाने सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकारआहे. “विधवा” हा अपमानास्पद वाटणारा बंधनांनी घेरलेला शब्द बदलून “एकल महिला” असे म्हणू असे बलकवडे यांनी आवाहन केले. नाशिक जिल्ह्यात गावो गावी जाऊन विधवा प्रथा बंद करण्याचे कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. भगूर शहरात ज्या एकल महिलांनाकुटुंबात आधार नाही व मुले लहान आहेत त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या झेप फाऊंडेशनच्या वतिने शिलाई मशीनचे वाटप करुन मोफत फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण येत्या महिन्यात देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस पुष्पलता उदावंत यांनी एकल महिलांना असणाऱ्या सरकारी योजना व पेन्शन विषयी माहिती दिली. प्रेमा राजगुरु यांनी प्रस्तावना करत सर्वांचे स्वागत केले. निलम शिरसाठ यांनी सुत्रसंचालन केले व सायरा शेख यांना महिलांचे आभार मानले. महिलांनी आपल्या आयुष्याचे अनुभव सागत नविन मैत्रीणींसोबत हसत खेळत कार्यक्रमाचा आनंद घेतला समाजात अजूनही विधवांना स्वीकारलं जात नाही, म्हणूनच हा कार्यक्रम वेगळी वाट घालून देणारा ठरला. या वेळी प्रेरणा बलकवडे, पुष्पलता उदावंत, अर्चना पारछा, वर्षा लिंगायत, प्रेमा राजगुरु, कांचन दळवी, अनुराधा दिवटे, किरण जाधव, शितलबलकवडे, ज्योती भागवत, निता शिंदे, संगिता झांजरे, विजया लिलके, आदिंसह असंख्य महिला उपस्थित होत्या.