बुधवार, ऑक्टोबर 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमात ३ हजाराहून अधिक मूर्ती संकलित

सप्टेंबर 10, 2022 | 3:10 pm
in स्थानिक बातम्या
0
PGC 0303 scaled e1662802670977

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देव द्या, देवपण घ्या या उपक्रमात यंदा सुमारे ३ हजार पेक्षा जास्त मुर्ती व निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदाचे १२वे वर्ष होते. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ९ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. गणेशभक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील यावेळी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या उपक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य लाभले.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातुन अध्यक्ष आकाश पगार यांच्या नेतृत्वाने “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. गणेशोत्सवातील १० दिवस जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार तसेच आवाहन करण्यात आले होते.

नाशिकच्या गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला. दिड, पाच व सात दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात आल्या होत्या. विसर्जनाच्या दिवशी सकाळी ९ वाजेपासूनच या उपक्रमाचे कार्यकर्ते चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या प्रवेशद्वाराजवळ खास तयार करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. निळ्या रंगाचे टि-शर्ट व हातमोजे घातलेले हे कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. या मुर्तींची पुजा व आरती करुन अत्यंत भावपूर्ण वातावरणात महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, प्रकाश चितोडकर, विशाल गांगुर्डे, वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, रोहिणी सोनवणे, मोनाली गवे, जयंत सोनवणे, संकेत निमसे, जयश्री नंदवानी, तुषार गायकवाड, सोनिया पगार, भाग्यश्री जाधव, रोहित कळमकर, कोमल कुरकुरे, भावेश पवार, शुभम पगार, दुर्गा गुप्ता, अतुल वारुंगसे, गौरी घाटोळ, हर्षिता माळी, प्रणाली शिंदे, सोनू जाधव, स्मिता शिंदे, कनिष्का माळी, ललित पिंगळे, अविनाश बरबडे, अमोल पाटील, मयूर पवार, वैभव बारहाते, सागर दरेकर, सिद्धेश दराडे, महेश मंडाले, कुणाल सानप, प्रसाद हिरे, मदन म्हैसधुणे, योगेश निमसे, हरी चौधरी, निलेश मोरे, देवा गायकवाड, भगवान भोगे, सागर बच्छाव, अमोल शेळखे, अमोल गायकवाड, चेतन गांगोडे, विशाल वानखेडे, बंटी भोळे, गोरख महाले, तुषार इप्पर, रोहन जाधव, दर्शन पवार, धनराज रौंदळ, मयुर सावंत, प्रथमेश देवरे, दत्तु जगताप, नितीन पाटणकर आदींनी परिश्रम घेतले.

Nashik Dev dya Devpan Ghya 3 Thousand Idol Collection

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन जण ठार तर एक जखमी

Next Post

घरफोडीचे सत्र सुरुच; तीन घरफोड्यांमध्ये साडे चार लाख रूपयाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, २९ ऑक्टोबरचे रशिभविष्य…

ऑक्टोबर 28, 2025
MOBILE
महत्त्वाच्या बातम्या

रिल बनवला…अपलोड केला… नाशकच्या तरुणाबाबत पुढं एवढं सगळं घडलं…

ऑक्टोबर 27, 2025
IMG 20251027 WA0037
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा… या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप… नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर चर्चा…

ऑक्टोबर 27, 2025
1002726049
महत्त्वाच्या बातम्या

नाशकात रणजी सामन्याचा थरार… बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल… या संघांमध्ये रंगणार सामना…

ऑक्टोबर 27, 2025
rainfall alert e1681311076829
मुख्य बातमी

सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…

ऑक्टोबर 27, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

घरफोडीचे सत्र सुरुच; तीन घरफोड्यांमध्ये साडे चार लाख रूपयाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011