नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हयाच्या देवळा तालुक्यातील मेशी येथील आदिवासी महिला सरपंच सुनंदा अहिरे यांनी ग्रामिण भागातील समस्या व शेतकरी कुटूंबाच्या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी स्वताच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. ज्यातून उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे ३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, शासना मार्फत शेतक-यांना देण्यात येणा-या कृषी योजना, ट्रॅक्टर, अवजारे यांचे अनुदान वेळेत मिळत नाही या सह विविध मागण्या त्यांनी पत्रात लिहिल्या आहेत.
Nashik Deola Women Sarpanch Blood Letter to PM Modi