देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळेच आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यातूनच आता कठोर निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील दहिवड ग्रामपंचायतीने आता यासंदर्भात एक पाऊल पुढे टाकले आहे.
कांद्यासह अन्य शेतमालाला भाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतक-यांनी आता राडकीय पुढा-यांना गाव बंदीचा निर्णय घेतला आहे. शेतमाल पिकवून त्यास भाव नसल्याने तो फेकून देण्याची वेळ आल्याने शेतक-यांची व्यथा लोकप्रतिनीधी,राजकीय पुढारी कोणीही शासन जरबारी मांडत नाही.
त्यामुळे नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेत गावात गावात राजकीय पुढा-यांना गावबंदीचा ठराव ग्रामसभेत मांडत गावात पुढा-यांना गावबंदी फलक लावण्यात आला. जिल्हयातील अनेक ठिकाणी आता राजकीय पुढा-यांना गावबंदीचे फलक लावण्यास या पुर्वी पासूनच सुरुवात झाली आहे.
Nashik Deola Village Political Leaders No Entry