देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असतांना ट्रॅक्टर पलटी होऊन तरुण शेतक-याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना देवळा तालूक्यातील खामखेडा येथे घडली. राकेश धोंडगे असे मृत तरुण शेतक-याच नाव आहे.
दुस-याच्या शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असतांना रस्त्याच्या कडेला असलेल्या चारी मध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन त्या खाली तो दबला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना समजताच आजू बाजूच्या नागरीकांनी धाव घेत राकेश याला बाहेर काढून त्याला देवळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे राकेश धोंडगे याचे महिनाभरापुर्वीच लग्न झाले होते. त्याच्या निधनामुळे सर्वत्र गावात हळहळ व्यक्त होत आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650095673717690368?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650115884017680384?s=20
Nashik Deola Farmer Death Tractor Accident