नाशिक : – देशाचा सर्वाधिक खर्च हा सुरक्षेच्या निगडीत साधन – सामुग्री आणि शस्त्र तयार करण्यात होत आहे . सुरक्षेच्या निगडीत विविध प्रकारचे शस्त्र देशाला सतत आयात करावे लागतात . यामुळे भारताचे चलन परदेशात मोठया प्रमाणावर जात असते.परदेशातून शस्त्र आयात करण्याचे टाळायचे असल्यास डिफेन्सच्या निगडीत शस्त्रांची निर्मिती देशांतर्गत करणे महत्त्वाचे आहे डिफेन्स क्षेत्र समृध्द करण्यासाठी देशतील मोठमोठया शहरामध्ये डिफेन्स हब होणे अत्यंत गरजेचे असून नाशिक हे डिफेन्स मॅन्युफॅक्चरींग हबसाठी उपयुक्त शहर आहे. नाशिक येथे डिफेन्स हबची निर्मिती करण्यासाठी शहरातील वेडरची संख्या वाढवा असे आवाहन खासदार गोडसे यांनी केले आहे .
नाशिक शहर हे मुंबई , पुणे , औरंगाबाद या सुवर्ण त्रिकोणातील महत्वाचे शहर असून शहराला मोठी कनेक्टीव्हिटी आहे.या ठिकाणी डिफेन्सच्या निगडीत ओझर येथील एचएएल , देवळाली कॅम्प जवळील आर्मी सेक्टर तर स्कुल ऑफ आर्टिलरी अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत डिफेन्स हबसाठी लागणा- या सर्वच बाबी शहरात अनुकूल आहेत.याचा फायदा घेण्यासाठी डिफेन्स निगडीत असलेल्या शहरातील उद्योग व्यवसायाच्या वृदधीसाठी शहरात डिफेन्स हबची निर्मिती व्हावी अशी मागणी उद्योजकांकडून खासदार गोडसे यांच्याकडे सतत होत होती . विविध संघटनांचे पदाधिकारी , लघु उद्योजकांकडून होणा – या मागण्यांची दखल घेत खा.गोडसे यांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून डिफेन्स हबसाठी सतत प्रयत्न सुरू होते.या प्रयत्नांना आता यश येवू लागल्याचे चिन्हे निर्माण झाली आहे .
खा.गोडसे यांच्या पुढाकाराने आणि अभ्युदय भारत मेगा डिफेन्स क्लस्टर या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने अंबड औद्योगिक वसाहती मधील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात आज सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शन करतांना गोडसे यांनी वरील प्रतिपादन केले.यावेळी व्यासपीठावर अभ्युदय भारत मेगा डिफेन्स क्लस्टरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक धवन रावळ, कार्यकारी अधिकारी मोहित श्रीवास्तव , नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष विक्रमभाऊ सारड़ा उपस्थित होते. सुरूवातीला अभ्युदय कंपनीने गेल्या दहा वर्षातील आपल्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली डिफेन्स निगडीत शस्त्र प्रकल्प उभारणी प्रचंड खर्चीक असल्याने प्रकल्प उभारणीस मर्यादा येत असतात. परंतु शस्त्रांचे सुटे भाग निर्मिती करण्यासाठी लघु व्यवसाय ( वेंडरशीप ) उभारणे सोपे असते . शेकडो वेंडर एकत्र आल्यास हबची निर्मिती करता येते . हब क्लस्टरमुळे डिफेन्सच्या क्षेत्रातील वेडरच्या व्यवसायाला चालना मिळून व्यवसायाची भरभराट तर होतेच शिवाय आपण राष्ट्रासाठी काही तरी करत असल्याचे समाधानही आपणास मिळत असते असे स्पष्ट करत शहरात डिफेन्स हबसाठी पोषक वातावरण असून आजमितीस सुमारे अडीचशे असलेली वेंडरची संख्या हजाराच्या घरात जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी खा गोडसे आणि अभ्युदय क्लस्टरचे मॅनेजिंग डायरेक्टर धवन रावळ यांनी केले आहे .
हबमुळे शहरातील इंजिनिअरिंगच्या विद्याथ्यांनाही लाभ होणार असल्याचे यावेळी रावळ यांनी स्पष्ट केले . डिफेन्स क्षेत्राला भविष्यात मोठी संधी असून अधिकाधिक वेंडरांनी क्लस्टर योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन सेवानिवृत्त कर्नल आनंद यांनी व्हच्र्युअलच्या माध्यमातून केले . क्लस्टर निर्मितीसाठी बँकांकडून होणा-या अर्थपुरवठयाची माहिती यावेळी संचिता मुजूमदार यांनी दिली. यावेळी सुरेंद्र माधुर , विवेक पाटील , कर्नल सारंग काशिकर , मनिष कोठारी ज्ञानेश्वर गोपाळे , उत्तमराव शिंदे , विकास पाटील,श्रीपाद कुलकर्णी , संतोष मंडलेचा , प्रज्ञा पाटील, श्रध्दा कोतवाल,देवरे संजय , डॉ कुवर , सचिन फडके , वैभव पाटील , कॉप्टन आगाशे , रिलायबलचे खेडेकर , डॉ.गायत्री फडे, एम.जी. कुलकर्णी , मिलौद चिंचोलीकर , डॉ.प्रशांत पाटील , मकरंद बेलगावकर , सुभाष पाटील , डीआयसीचे दवंगे आदींसह डिफेन्स व्यवसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.