नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ९ जुलै अखेर ६३.९० टक्के साठा आहे. गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्व धरण भरले होते. त्यानंतर त्याच्यात घट झाली. आता जूलैमध्ये पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर धरण पुन्हा भरु लागले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ५५.२२ टक्के तर समुहात ६८.३८ टक्के साठा आहे.
नाशिक जिल्ह्यातील आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, नांदूरममध्यमेश्वर, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, माणिकपूंज यासह बहुतांश धरण गेल्या पावसाळयात ओव्हरप्लो झाली होती. त्यानंतर इतर धरणातही आता ९९ टक्केच्या आसपास पाणीसाठा होता. आता ९ जुलैपर्यंत धरणाचा साठा ६३.९० टक्के झाला आहे.
तीन महिन्यापूर्वी २८ एप्रिल अखेर ३३.६२ टक्के साठा होता. त्यात दुपट्टीने वाढ झाली आहे. अर्थात या तीन महिन्यात धरणात अवकाळी पाऊसाचे पाणी येत असले तरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापरही झाला.
