नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण ९३ टक्के भरल्याने आणि येणाऱ्या पाण्याचा वेग पाहता गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून धरणातून ११८८ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सुरू झाला आहे.
गिरणा धरण यंदा उशीरा भरले असले तरी धरण भरल्याने जळगाव जिल्हा व मालेगाव, नांदगाव तालुक्याचा पाणी प्रश्न त्यामुळे सुटला आहे. रब्बीच्या सिंचनाचा प्रश्न धरण भरल्याने सुटणार आहे. धरण भरून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदी काठच्या नगरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गिरणा धरणाची क्षमता १८५०० दशलक्ष घटफुट असून ते नाशिकच्या गंगापूर धरणाच्या साडेतीन पट आहे. गंगापूर धरणाची क्षमता ५६३० दशलक्ष घनफुट आहे.