नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वच्छ भारत, पर्यावरणपूरक भारत, प्रदूषण मुक्त भारत असा संदेश घेऊन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या काही वरिष्ठ सायकल स्वारांनी देशाच्या स्वर्णिम चतुर्भज (Golden Quadrilateral) सायकल ने पुर्ण करण्याचा उपक्रम हाती घेतला. या प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात 4 हजार सहाशे किलोमिटरचा प्रवास करून गुरूवारी पहाटे ही टीम दिल्लीत दाखल झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या 7 वरीष्ठ सायकलस्वारांनी स्वर्णिम चर्तुभुज प्रवास करण्याचा संकल्प करून 17 फेब्रुवारीपासून या सायकल प्रवासाला सुरूवात केली असून 2 मार्चपर्यंत रिले पद्धती सायक्लिंग करून दिल्लीपर्यंतचा 4600 किमीचा प्रवास पूर्ण केला. या सायकल समूहाने परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी ही त्यांच्यातील ऊर्जा आणि ऊत्साह कायम दिसत होता. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी या चमुचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी त्यांनी आपल्या सायकल प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली. नाशिक सायकलिस्ट फाँउडेंशन चे चंद्रकांत नाईक (72 वर्ष) यांनी सांगितले, निश्चित अशा उद्देशासाठी सायकल चालविणे हा आमचा संकल्प आहे. स्वर्णिम चतुर्भज हा सायकल प्रवास पूर्ण करीत असताना वर्तमानाची गरज ओळखून स्वच्छ भारत, पर्यावरण पूरक भारत, प्रदूषण मुक्त भारत असा संदेश देत या सायकल परिक्रमेला सुरवात झाली असल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यांच्या सायकल चमुमध्ये अनिल वराडे(68वर्ष) रमेश धोटे (64 वर्ष),रविंद्र दुसाने (62 वर्ष), अविनाश लोखंडे (62वर्ष), मोहन देसाई (60 वर्ष), संजय कुलकर्णी (60 वर्ष) केवळ वरिष्ठ नागरिक आहेत, हे विशेष. या चमुने 17 फेब्रुवारीला सुरूवात केली. प्रत्येक सायकलस्वार किमान 20 किमी सायकल चालतो पुढे दुसरा सायकलस्वार चालतो. असे रिले पद्धतीने सायकल चालवित असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मागील 12 वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन असून या फाउंडेशनमध्ये सर्वच वयोगटातील किमान 4 हजार सायकलस्वार सदस्य आहेत. प्रत्येक महिन्याला एक सायकल ट्रिप काढली जाते. यापूर्वी नर्मदा, गोदावरी परिक्रमा पूर्ण केल्या आहेत. पानिपत वारी असेही उपक्रम राबविले आहे. यासह पंढरपूरची, शिर्डीची, सिद्धिविनायक सायकल वारीही काढली जाते. जन जागृतीपर दिनविशेष उपक्रमातही फाउंडेशनच्या माध्यमातून सायकलवरून जन जागृती उपक्रम राबविले जात असल्याचे चमुच्यावतीने सांगण्यात आले.
Nashik Cyclist Swarnim Chaturbhuj Vari in Delhi