नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील तिघांना शेअर मार्केट ट्रेंडीगमधील कमाईसह अन्य आमिष दाखवत भामट्यांनी तब्बल साडे चाळीस लाखांस गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद नगर भागात राहणारे योगेश मेखा यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मेखा याच्यासह शहरातील प्रमोद पाटील व निखील घयासी या गुंतवणुकदारांशी गेल्या मे महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. तिघेही इंटरनेटवर व्यावसायीक माहिती सर्चिंग करीत असतांना त्यांना गुंतवणुक सेवांच्या नावे असलेल्या विविध व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
या ग्रुपमध्ये समाविष्ट सभासद वेगवेगळया गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळविल्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर ग्रुपमधील काही सदस्यांच्या नावे असलेल्या मोबाईल क्रमांकावरून नव्याने समाविष्ट झालेल्या सदस्यांना संपर्क साधला जातो. पसंतीनुसार तिघांना प्रलोभने दाखविली गेल्याने ही फसवणुक झाली. अवघ्या तीन महिन्यात योगेश मेखा यांना २८ लाख ४२ हजार प्रमोद पाटील यांना शेअर मार्केट ड्रेंडीग व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून ७ लाख १९ हजार तर घयासी याना ४ लाख ४८ असा सुमारे ४० लाख ४७ हजार रूपयांना गंडविले असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.