नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अक्षय तृतीया या सणाचे औचित्य साधत करन्सी नोट प्रेस महामंडळाने नाशिक रोड येथील कामगारांबरोबर नागरिकांसाठी शुद्ध सोन्या चांदीची नाणी विक्रीसाठी उपलब्ध केली असल्याची माहिती आयएसपी मजदूर संघाचे जगदीश गोडसे यांनी दिली.
सीएनपी नोट प्रेस समोरील इमारतीत २० ते २६ एप्रिल दरम्यान नाण्यांची विक्री सुरू असणार आहे. यासाठी नाव नोंदणी आयएसपी एचआर विभाग किंवा सहाय्यक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाच ते दहा ग्रॅम पर्यंत सोन्याची नाणी व सोन्याचा २० ग्रामचा बार तसेच चांदीची नाणी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1649002844668956672?s=20
Nashik currency-note-press-sell-gold-silver-coins