नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चैत्रातल्या पालवी प्रमाणे नव चैतन्य निर्माण करणारी संकल्पना “स्वर पालवी”. हिरव्या कोवळ्या वेलींच्या, वृक्षांच्या पानांकडे पाहिल्यावर सुचलेली एक सहज संकल्पना. कोविडच्या संकटाची पर्ण गळती होऊन,मात करत नव्याने फुलणारी.. उमलणारी स्वर पालवी.सुवर्णा क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून उमललेली स्वर पालवी.
श्री. प्रशांत जुन्नरे यांच्या बाबाज थिएटर्स आणि सुवर्णा क्षीरसागर यांच्या स्वरांजली संगीत संकुल संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक मधे प्रथमच असा प्रयोग साकार होतो आहे.. ज्यामध्ये 1.. नव्हे..2 नव्हे तर तब्बल 10 कलांच्या कलाकृती एकाच रंगमंचावर,40 हुन अधिक महिला कलाकार साकारणार आहेत..जेष्ठ नागरिक आणि सर्व कलाप्रेमींसाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये नृत्य, नाट्य, गायन, वादन,अभिवाचन,काव्य, कथा, रंगावली, शिल्पकला, चित्रकला अश्या दहा कलांचा समावेश आहे. नाशिक मधील नामवंत महिला कलाकारांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या आदरणीय डॉ. सौ. रंजना सुधीर कुलकर्णी, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या जेष्ठ गायिका आदरणीय सौ.हेमा नातू यांना सन्मानीत करण्यात येत आहे तसेच संगीत क्षेत्रातील नव पालवी म्हणून दसककर भगिनी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. नव्या पिढी पासून जेष्ठांपर्यंत अश्या सर्वांच्याच मनातली नव पालवी फुलवणारा, “स्वर पालवी” सन्मान दश कलांचा हा सोहळा रविवार दि.1 मे 2022 रोजी सायं.6.30 वाजता नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाटयगृहात संपन्न होत आहे.
यात संगीत नाशिक मधील नामवंत गायिका सौ. मीना परुळकर -निकम, रसिका नातू, भार्गवी कुलकर्णी, ,गायन आणि साईड रिदमिस्ट- गौरी सारंग -वैद्य, कथक नृत्यांगणा सुमुखी अथणी आणि त्यांच्या शिष्या , भरतनाट्यम नृत्यांगणा सोनाली करंदीकर आणि त्यांच्या शिष्या ,दिपाली सुरळीकर आणि त्यांच्या शिष्या ,कीबोर्ड वादका रागेश्री धुमाळ, कृपा परदेशी, बासरी वादका सानिका जोशी, सतार वादका सौ. ज्योती डोखळे, सौ. सुनीता देशपांडे, संबळ-हलगी -दिमडी वादका मोहिनी भुसे, तबला वादका राधिका रत्नपारखी- गायधनी, वैष्णवी भडकमकर, गिटार वादका पूजा पाठक-शुक्ला , ऑक्टॉपड वादका प्रिया वझे,अभिवाचन कर्त्या पल्लवी कुलकर्णी,लेखिका दिप्ती जोशी, कवयित्री भाग्यश्री गुजर, चित्रकार समृद्धी चिखलीकर ,अभिनेत्री -प्राजक्ता प्रभाकर, सौ. ईश्वरी कोरान्ने,रंगावली -पूजा. बेलोकर,म्युरल /शिल्पकार शुभांगी बैरागी,व्हायोलीन वादका चिन्मयी जोशी , हार्मोनियम आणि व्हायोलीन वादका सुवर्णा प्रकाश क्षीरसागर या सर्व कलाकार आपली कला प्रस्तुत करणार आहेत.
तसेच निवेदन सुनेत्रा मांडवगणे करणार असून चलचित्रण श्रुती काळे -कवी करणार आहेत सदर कार्यक्रमास चितळे एक्सप्रेस, अफलातून ग्रुप ( पिंपळगाव बसवंत ), लायन्स क्लब ऑफ नाशिक (सुप्रीमो ), श्री. शामराव केदार, श्री. जे. पी जाधव आणि श्री. हेरंब गोविलकर यांचे सहकार्य लाभले आहे