नाशिक – येथील तिडकेनगर मधील बाजीरावनगर येथे असलेल्या ध्रुवअंकुर पॅराडाईज या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या युवकाने चौथ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. प्रितेश धनंजय प्रभु (वय २६) असे या मृत युवकाचे नाव आहे. प्रितेशने मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या चौथ्या मजल्यावरील घरातून उडी मारली. त्यामुळे त्याच्या डोक्याला, खांद्याला आणि शरारीला गंभीर दुखापत झाली. त्याला त्याच्या वडिलांनी (धनंजय गोपाळराव प्रभु) तातडीने उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.