नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काल दिवसभरात हत्येच्या दोन घटना घडल्यानंतर आता आज आणखी एका खुनाला वाचा फुटली आहे. सातपूरमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास युवकांमध्ये झालेल्या हाणामारीत युवकाचा खुन करण्यात आला आहे.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरे मळा परिसरात काल मध्यरात्री युवकांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळी संतोष जयस्वाल (वय ३०) या युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारण्यात आला. या गंभीर वारामुळे संतोषचा मृत्यू झाला आहे. संतोष रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे पाहून दोन्ही मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. हा खुन जुन्या भांडणाची कुरापत काढून झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सातपूर पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसेच, याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
Nashik Crime Youth Murder in Satpur Area