नाशिक – पंचवटीतील हिरावाडी परिसरातील त्रिमूर्ती नगरात मागील भांडणाची कुरापत काढून दाेघांवर सात जणांच्या टाेळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यातील एका तरुणाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या एका तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बाळा मंडलिक (रा. अमृतधाम, पंचवटी) आणि व्यंकटेश शर्मा (गप्पी) अशी दाेघांची नावे असून गप्पीची प्रकृति चिंताजनक असल्याचे कळते. गुरुवारी सायंकाळी त्रिमूर्ती नगरात सचिन जाेशी या संशयितासह सात ते आठ जणांच्या टाेळक्याने मंडलिक आणि गप्पीला गाठून मागील भांडणाची कुरापत काढली. त्यानंतर वाद वाढत असताना टाेळक्याने धारदार हत्यारे काढून दाेघांवर वार केले. त्यानंतर संशयित पळून गेले. घटनेची माहिती कळताच पंचवटी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आज पहाटे गप्पी याचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास मोठ्या गतीने सुरू केला आहे.