नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील गंगापूररोड भागात बांधकाम साईटवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका तरुणाच्या डोक्यावर लाकडी ठोकळा पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गंगापूररोड पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गंगापूररोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण कुमार मांडवी (वय १८, रा. आनंदवल्ली, गंगापूररोड) असे मृत युवकाचे नाव आहे. अरुण मांडवी हा गंगापूररोड भागातीलच बांधकाम साईटवर मजूर म्हणून कार्यरत होता. ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. बांधकाम साईटवर पोहचल्यानंतर त्याने त्याचे काम सुरू केले.
त्याचवेळी अचानक वरच्या माळ्यावरुन एक लाकडी ठोकळा अरुणच्या डोक्यावर पडला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही बाब साईटवरील अन्य कामगारांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने अरुणला जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र, लाकडी ठोकळा जोरात डोक्यावर पडल्याने त्याच्या डोक्यात मोठा रक्तस्त्राव झाला. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांनी अखेर त्याचा म-त्यू झाला आहे. याप्रकरणी गंगापूररोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642823753628528642?s=20
Nashik Crime Youth Dead Wood Block Collapse Head