नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील पाथर्डी फाटा परिसरात जमावाने एका युवकाला जोरदार बदडल्याची घटना समोर आली आहे. या युवकाने एका तरुणीची छेड काढल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी युवकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर या युवकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी वाढत आहेत. महिला आणि युवतींचे छेड काढण्याचे प्रकार गंभीर आहेत. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथक नेमण्यात आले असले तरी त्याचा फारसा वचक नसल्याचे दिसून येते. त्यातच पाथर्डी फाटा परिसरात एका युवकाला स्थानिक नागरिकांनी धो धो धुतल्याचे पुढे आले आहे. पाथर्डी फाटा परिसरात एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात होती. त्याचवेळी एका युवकाने हॉटेल एक्सप्रेस इन परिसरात या मुलीची थेड काढली. ही बाब या मुलीने घरी जाऊन पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी संबंधित युवकाला शोधून विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी मोठा जमाव तेथए जमला. अखेर जमावाचा संयम सुटला आणि त्यांनी या युवकाला चांगलेच बदडले. या युवकाचे कपडेही पूर्णपणे फाटले. या घटनेची दखल घेत पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले. त्यानंतर या युवकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दुचाकी पार्क करण्याच्या वादातून मारहाण
दुचाकी पार्क करण्याच्या वादातून दोघा भावांना टोळक्याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना धात्रकफाटा भागात घडली.याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश जाधव व त्याचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. सागर व राहूल पाटील (रा.दोघे अंबड वजन काटा शेजारी) हे दोघे भाऊ शुक्रवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास धात्रक फाटा भागात गेले होते. सागर व्हिलेज या सोसायटीच्या पार्किंगमध्ये ते आपली मोपेड एमएच १५ सीटी ४१९२ पार्क करीत असतांना ही घटना घडली. दुचाकी निट का पार्क केली नाही या कारणातून संशयित त्रिकुटाने शिवीगाळ करीत दोघा भावांना मारहाण लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत दोघे भाऊ जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक राम घोरपडे करीत आहेत.
Nashik Crime Youth Beaten by Mob Girl Molestation









