दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एकाने दारू पाजून तरूणीवर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मित्रासमवेत शरिरसंबध ठेवण्याची मागणी करण्यात आल्याने तरूणीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक देवकाते (२०) व सुमित नामक तरूण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे संशयित देवकाते याच्याशी प्रेम संबध जुळले होते. गेल्या शुक्रवारी (दि.७) संशयिताने अॅक्टीव्हा दुचाकीवर बसवून तिला त्र्यंबकरोडवरील एका लॉजवर नेले.
या ठिकाणी दारू पाजून संशयिताने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या प्रसंगी संशयिताने दोघांचे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढून हे कृत्य केले. त्यानंतर संशयिताने फोटो व व्हिडीओ सुमित नामक मित्रास पाठवून त्याच्याशीही शरिर संबध ठेव नाही तर फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पिडीतेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.
खड्डयात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाईप लाईन रिपेअरींगसाठी घोदलेल्या सहा फुट खड्यात पडल्याने विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील महालक्ष्मीनगर भागात झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश किनिराम यादव (३३ रा.श्रीकृष्ण अपा. कारगील चौक चुंचाळे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. यादव शनिवारी (दि.८) रात्री अकरा वाजेच्या सुमारा, आपल्या एमएच १५ डीटी २८३५ या दुचाकीवर प्रवास करीत होता. माऊली लॉन्स कडून आपल्या घराच्या दिशेने तो भरधाव वेगात विनाहेल्मेट जात होता.
त्याचवेळी चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. सोनाली वाईन शॉफ जवळ भरधाव दुचाकी बॅरिकेटीग व बांबुचे कुंपन तोडून पाईप लाईन रिपेअरींगसाठी खोदलेल्या सहा फुट खड्डयात पडली. या घटनेत योगेश यादव याचा मृत्यू झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास जमादार टोपले करीत आहेत.
कारमधून प्रवास करणाऱ्या टोळक्याची हुल्लडबाजी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कारमधून प्रवास करणाऱ्या टोळक्याने हुल्लड़बाजी केल्याचा प्रकार गंगापूररोडवर घडला. या घटनेत धावत्या कारचा दरवाजा उघडून दुचाकीचालकास पुढे जाण्यात अडथळा निर्माण करण्यात आला असून, याबाबत जाब विचारल्याने टोळक्याने दोघा मित्रांना भररस्त्यात बेदम मारहाण करीत एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली.
या हाणामारीत दोघे मित्र जखमी झाले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यश प्रदिप वत्स (२८ रा.गुलमोहर कॉलनी, जिओ पेट्रोल पंपामागे, आनंदवली) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. यश वत्स व त्याचा मित्र समीर कुलकर्णी हे दोघे मित्र शनिवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास एमएच १५ सीयु ३३१५ या मोपेड दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा प्रकार घडला.
आनंदवली सिग्नलच्या दिशेने दोघे मित्र जात असतांना एमएच ०५ बीएस ५६०० मधून हुलडबाजी करीत आलेल्या टोळक्याने आपल्या ताब्यातील वाहन इकडे तिकडे चालवून पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यात मज्जाव केला. यावेळी दोघा मित्रांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता कारमधील एकाने धावत्या कारचे दार उघडून पुढे जाण्यास मज्जाव केला.
यामुळे दोघा मित्रांनी आवाज देवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी दुचाकी अडवून दोघा मित्रांना भररस्त्यात लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत यश वत्स याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडण्यात आली असून दोघे मित्र जखमी झाले आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.







