नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकतर्फी प्रेमातून तरुण मुलीचे अपहरण झाल्यानंतर तासाभरातच आई-वडिलांनी भगूर नानेगाव रेल्वे ट्रॅकवर गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास संबंधित १९ वर्षीय तरुणी आई वडिलांसोबत दुचाकीवरुन प्रवास करत होती. त्यावेळेस चारचाकीतून आलेल्या समाधान झनकरने आपल्या साथीदारांसह नाशिकच्या घोटी-पांढुर्ली महामार्गावरुन तिचे अपहरण केले. या अपहरणानंतर आई वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
अपहरण करणाऱ्या समाधान झनकरसह त्याच्या साथीदाराविरोधात अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रविवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुलीच्या मामाने तक्रार दिली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. अपहृत मुलीचा आणि आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी त्यासाठी पथके रवाना केली आहे.
आरोपी समाधान झनकरचे या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याच्याकडून तरुणीकडे लग्नासाठी वारंवार तगादा लावला जात होता. मुलीचे अपहण आणि तरुणाचा लग्नासाठी तगादा, यामुळे आई-वडिल कंटाळले होते. त्यातच या दोघांच्या देखत झनकरने मुलीचे अपहरण केले. ही बाब त्यांच्या खुपच जिव्हारी लागली. त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
Nashik Crime Young Girl Kidnapped Mother Father Suicide