नाशिक – ऐन दिवाळीच्या सणात शहरामध्ये महिलेचा निघृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, महिलेवर चाकूने २५ वार केले असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
गंगापूर पोलिस स्टेशन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाच्या घटना नित्याच्या झाल्या असून लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येस एका महिलेचा चाकूचे २५ वार करून तिचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा आंबेकर (रा. संत कबीरनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिले सोबत राहणाºया इसमाने तिचा खून केल्याचे बोलले जात आहे. बुधवारी (दि.३) मध्यरात्री ही घटना घडल्याचा अंदाज असून संशयित संतोष आंबेकर फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे आंबेकरवर पूवीर्ही खुनाचे गुन्हे दाखल असल्याचे कळते.