नाशिक – कोरोनाचे निर्बंध झुगारुन विनापरवानगी क्रिकेट स्पर्धा नियोजनाबद्दल तिघांवर मुंबई नाका पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभान उर्फ झाकी मोहम्मद हनिफ शेख (वय ३५, साईनाथ अपार्टमेंट अशोका टॉवर, वेदांत वैशाल नाईक (वय २५, सानंत बंगला, राका कॉलनी, गंगापूर),
अभिषेक भालचंद्र वैद्य (वय २५, आव्हाड निवास जाधव मखमलाबाद रोड पंचवटी) अशी संशयितांची नावे आहे. संशयितानी श्री हरी कुटे मार्गावरील गोकूळ नगर समोरील बाक्स आॅफीस टर्फ येथे १२ ते १६ डिसेंबर दरम्यान मुस्लीम प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे नियोजन केले. कोरोना प्रादुर्भावामुळे प्रतिबंध असतांना गर्दी जमिवीली पोलिस आयुक्तांच्या सोशल डिस्टन्सींग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात हवालदार भाउराव गार्गुर्डे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.