नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरखर्चासह माहेरून ब्रेसलेट व सोनसाखळी आणावी या मागणीसाठी विवाहीतेचा छळ करीत तिच्यावर चार महिने अनैसर्गिक शरिर संबध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासूविरूध्द भद्रकाली पोलिस ठाण्यात मानसिक व शारिरीक छळ आणि अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने नाशिक भागात राहणाऱ्या पिडीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी पिडीतेचा विवाह झाला. जुलै २०२१ ते ३१ आॅक्टोबर २०२१ या चार महिन्यांच्या काळात पतीने मोबाईल आणि लॅपटॉपवर अश्लिल व्हिडीओ दाखवून वेळोवेळी पिडीतेसोबत अनैसर्गिक संबध ठेवत छळ केला. तर सासूने लग्नात मुलास ब्रेसलेट आणि सोनसाखळी दिली नाही तसेच घरखर्चासाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ केला. या काळात सासूने शिळे अन्न खान्यास दिल्याचे तक्रारीत म्हटले असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
धमकी देत महिलेला मारहाण
माल ट्रक खरेदी विक्री व्यवहाराची कुरापत काढून एकाने हात पाय तोडण्याची धमकी देत महिलेस मारहाण केली. या घटनेत विवाहीतेचा विनयभंग करण्यात आला असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता आणि वडाळागावात राहणाºया संशयितामध्ये वाहन खरेदी विक्रीचा व्यवहार आहे. गेल्या गुरूवारी (दि.१) सायंकाळी संशयिताने महिलेचे वडाळा पाथर्डी मार्गावरील पांडवनगरी येथील घर गाठून मालट्रक व्यवहाराची कुरापत काढून महिलेस शिवीगाळ व मारहाण केली. याप्रसंगी दांम्पत्याचे हात पाय तोडण्याची धमकी देत त्याने पिडीतेचा विनयभंग केला. अधिक तपास, सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे करीत आहेत.
Nashik Crime Various Demands Wife Sexual Harassment