नाशिक – वडाळा गावातील पत्रा गल्लीत दाम्पत्य आणि महिलेच्या वादात ति-हाईताने पतीवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत सदर व्यक्ती जखमी झाला असून याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहीन मेहबूब शाह (22 रा.म्हाडा बिल्डिंग वडाळागाव) यानी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शाह दाम्पत्याचा शुक्रवार (दि.17) रोजी रात्री पत्रागल्लीत ओळखीच्या शबाना शाह यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद सुरू असताना ही घटना घडली.दाम्पत्याचा महिलेशी वाद सुरु असताना घरातून बाहेर आलेल्या रमजान नामक इसमाने शाह याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत शाह जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.