नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना तब्बल पावणे दोन कोटीला गंडा घालणा-याला पोलिसांनी गजाआड केले आहे. सुशिल भालचंद्र पाटील (३६ रा.लोचन अपार्टमेंट, मधुबन कॉलनी मखमलाबाद नाका) असे अटक केलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे.
या फसवणूक प्रकरणी अनिल अशोक आव्हाड (३४ रा. लॅमरोड, देवळाली कॅम्प) या बेरोजगाराने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील याने वरिष्ठ सरकारी अधिका-यांशी आपली सलगी असल्याचे भासवून हा गंडा घातला आहे. २०१८ मध्ये संशयिताने आव्हाड यांची ओळख करुन घेतली.
आव्हाड यांच्यासह त्यांच्या नातेवाईक बेरोजगारांना सरकारी नोकरी मिळवून देतो असे सांगून त्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संबधिताकडून वेळोवेळी सुमारे २ कोटी ७६ लाख रूपयांची रक्कम उकळली. या सर्व रकमा आव्हाड यांच्या घरी व संशयिताच्या घरी स्विकारण्यात आल्या,
पाटील याने सहा वर्ष उलटूनही नोकरी अथवा पैसे परत न मिळाल्याने बेरोजगारांनी त्याच्याकडे तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ केली. त्यामुळे या सर्व फसवणूकीची देवळाली पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. या सर्व फसवणूक प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लियाकात पठाण करीत आहेत.
Nashik Crime Unemployment Cheating FIR