गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हृदयद्रावक! ऊसाच्या शेतात खेळणाऱ्या चिमुकलीला ट्रॅक्टरने चिरडले; नांदूरनाका परिसरातील घटना

by India Darpan
फेब्रुवारी 19, 2023 | 10:31 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऊसाच्या फडात खेळतांना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून दोन वर्षीय चिमुरडीचा करूणअंत झाल्याची घटना औरंगाबाद रोडवरील माडसांगवी ते नांदूरनाका दरम्यानच्या एका शेतात घडली. ऊसतोड कामगारांची ती मुलगी असून, याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक भाऊराव लक्ष्मण घुलूम (रा.पवार मळा औरंगाबाद रोड) याच्याविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जागृती प्रेमचंद जाधव (रा.तपोवन) असे मृत बालिकेचे नाव आहे. शहर परिसरात ऊसतोडीची लगभग सुरू असून, राज्यभरातील कामगारांच्या टोळ्या ठिकठिकाणी कोपी करून वास्तव्यास आहेत. मुळचे नागदताडा ता. कन्नड येथील प्रेमचंद जाधव हे कुटूंबियासह तपोवन भागात आपल्या टोळीसमवेत राहतात. औरंगाबाद रोडवरील माडसांगवी शिवारात या टोळीच्या मुखीयासह सर्व कामगार शुक्रवारी (दि.१७) ऊसतोडणीसाठी गेले असता ही घटना घडली.

बाबासाहेब तिडके याच्या शेतात कामगार आपल्या कामात मग्न असतांना त्यांची मुले फडात खेळत बागडत होती. सायंकाळच्या सुमारास सर्व कामगार आपल्या हातातील काम आटोपून घराकडे परण्याच्या गर्दीत असतांना फडात बागडणारी जागृती ऊस भरण्यासाठी भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरच्या पुढील चाकाखाली आली. या घटनेत चाक अंगावरून गेल्याने तिचा चिरडून मृत्यू झाला. वडिल प्रेमचंद जाधव यांच्यासह अन्य कामगारांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अधिक तपास आडगावचे उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.

Nashik Crime Tractor Accident Girl Child Killed

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गंगापूररोडवर दुचाकी झाडावर आदळली; २ ठार, १ जखमी, रस्त्यातील झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Next Post

मोबाईल ग्राहकांना सेवा मिळत नसल्याने ट्रायने दूरसंचार कंपन्यांना खडसावले

Next Post
संग्रहित फोटो

मोबाईल ग्राहकांना सेवा मिळत नसल्याने ट्रायने दूरसंचार कंपन्यांना खडसावले

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011