गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुन्हे दाखल झाल्यानंतर सावकारांचे धाबे दणाणले! १० जणांना न्यायालयीन कोठडी; इतरांची जामीनासाठी धावाधाव

अखेर २१ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल; सातपूरमधील तिघांच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक पोलिसांची कठोर कारवाई

by Gautam Sancheti
जानेवारी 30, 2023 | 12:01 pm
in संमिश्र वार्ता
0
fir

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर येथे व्यावसायिक कुटुंबातील तिन्ही पुरुषांनी आत्महत्या केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळेच तब्बल २१ सावकारांविरोधात सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. यातील १० सावकारांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, उर्वरीत ११ जणांनी जामीनासाठी न्यायालयात धावाधाव सुरू केली आहे.

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शिरोडे (वडील, वय ५५), प्रसाद शिरोडे (मोठा मुलगा, वय २५), राकेश शिरोडे (वय २३) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या तिघांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिरोडे कुटुंबिय हे अशोकनगर शेवटचा बसस्टॉप परिसरात फळांचा व्यवसाय करीत होते.

शिरोडे कुटुंबीय हे मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी आहेत. गेल्या १० वर्षांपूर्वी ते नाशिकमध्ये व्यवसायानिमित्त आले. राधाकृष्ण नगर परिसरात त्यांचे घर आहे. वडिल दीपक हे अशोक नगर शेवटचा बसस्टॉप येथील भाजी बाजाराजवळ फळ विक्री करत होते. तर त्यांची मुले प्रसाद आणि राकेश हे चारचाकी वाहनांवर फळविक्रीचा व्यवसाय शिवाजी नगर परिसरात करायचे.

आर्थिक स्थिती हलखीची असल्याने शिरोडे कुटुंबिय कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. रविवारी दुपारच्या सुमारास दीपक शिरोडे यांच्या पत्नी प्रतिभा आणि त्यांचा लहान चिरंजीव हे काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. ही संधी साधून वडिलांसह दोन्ही मुलांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरातील तिन्ही खोलींमध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेत आपले जीवन संपविले. थोड्या वेळाने आई आणि लहान मुलगा घरी येताच त्यांनी दरवाजा ठोठावला. पण, आतून कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे ते घाबरले. परिसरातील नागरिकांना त्यांनी आवाहन केले. त्यानंतर दरवाजाची कडी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश करताच तिन्ही पुरुषांनी गळफास घेतल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे या मातेने व लहान मुलाने जोरदार हंबरडा फोडला.

कन्येचा जन्म आणि पित्याची आत्महत्या
प्रसाद शिरोडे यांच्या पत्नी या गर्भवती असल्याने मुंबईत माहेरी गेल्या होत्या. रविवारी सकाळीच त्यांची प्रसुती झाली. आणि त्यांनी कन्येला जन्म दिला. शिरोडे कुटुंबात लक्ष्मीने आगमन केल्याची वार्ता सगळीकडे पसरली. मात्र, अशा आनंदाच्या प्रसंगीच शिरोडे कुटुंबाने अतिशय कठोर निर्णय घेतला. कन्येचा जन्म झालेला असताना पित्यासह आजोबा आणि काका यांनी आत्महत्या केल्याने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

या सावकारांवर गुन्हा दाखल
तिन्ही पुरुषांच्या आत्महत्ये प्रकरणी शिरुडे कुटुंबातील प्रतिभा शिरूडे यांनी सातपूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, २१ सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये भास्कर सोनवणे, मुकेश सोनवणे, शांताराम नागरे, (रा. पिंपळगाव), संजू पाटील (रा. शिवाजीनगर), एम आर धामणे, राजाराम काळे, मुकेश लोहार, शेखर पवार (रा. शिवाजीनगर), प्रकाश गोन्हें, सौ नलिनी शेलार, बाविस्कर साहेब (रा. अशोक नगर), कैलास गोराणे, भूषण चौधरी, गरीब नवाज, भरत वंजी पाटील, किरण बोडके, गिरीश खुटाडे, मुरली पाटील, अरुणा पाटील, आकाश इंगळे, शरद पिंगळे या २१ खासगी सावकारांचा समावेश आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे), शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे), फौजदारीपात्र धाकदपटशा, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याची धमकी, समान उद्देश साध्य करण्यासाठी अधिक व्यक्तींनी केलेली कृती तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
मयत दीपक, प्रसाद व राकेश या तिघांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास गंगापूर गावातील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातपूर परिसरातील अनेक व्यावसायिक व समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान, फळ विक्रेत्याच्या कुटुंबावर झालेल्या या आघातामुळे सातपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळेच सातपूर परिसरातील बहुतांश दुकाने आज सकाळी बंदच होती. तिन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्व दुकाने उघडण्यात आली.

Nashik Satpur Shirode Family 3 Mens Suicide
Nashik Crime Three Peoples Suicide FIR Registered 21 Savkar
Nashik Police

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

‘पठाण’ची रेकॉर्डब्रेक कमाई! आतापर्यंत जमवला एवढा गल्ला; बाहुबली, केजीएफलाही टाकले मागे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
pathaan e1674223006417

'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई! आतापर्यंत जमवला एवढा गल्ला; बाहुबली, केजीएफलाही टाकले मागे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011