नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडीयावर रिल अपलोड करणे एका तरूणास चांगलेच महागात पडले. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेणाºया पोलीसांनी इन्स्टाग्राम वरिल सदर रिल हुडकून काढली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दहशत निर्माण केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन नवनाथ पवार (रा.रोकडोबावाडी, देवळाली गाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित रिल बहाद्दराचे नाव आहे. याबाबत अंमलदार गवळी यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीसांकडून कारवाईचा धडका सुरू आहे.
सोशल मिडीयावर लक्ष केंद्रीत करीत पोलीसांकडून रिल बहाद्दरांचाही चांगलाच समाचार घेतला जात आहे. भयमुक्त नाशिक या घोषवाक्यास अनुसरून दहशत निर्माण करणाºयाना चाप लावला जात आहे.
याच पार्श्वभूमिवर सायबर शाखेसह पोलीस ठाणे निहाय यंत्रणा कामाला लागली आहे. सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह आणि दहशत रिल तपासल्या जात आहे. रविवारी (दि.२६) सोशल मिडीयावर व्हायरल झालेली एक रिल पोलीसांच्या नजरेत बसली. संशयिताने समाजात किती दहशत आहे. यासाठी मुले सोबत ठेवून दहशत निर्माण केल्याचा तसेच शांता व सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप केला आहे.
इन्स्टाग्राम या सोशल साईडवर संशयिताने ओ निर्दोस था फिर भी उसने सजा काटी… मै गुन्हेगार हू फिरभी आझाद घुम रहा हू … अरे एक्झाममे मै कॉपी करनेसे डरता था आज मुझसे जमाना डरता है अशी रिल अपलोड केल्याचे आढळून आले आहे. या घटनेची पोलीसांनी तात्काळ दखल घेत अंमलदार गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवालदार लखन करीत आहेत.
सोलर सिस्टीम बसविण्याची ग्वाही देत लाखोंना गंडा
सोलर सिस्टीम बसविण्याची ग्वाही देत एका सोलर विक्रेत्याने डॉक्टरसह अन्य एकास दोन लाख रूपयांना गंडा घातला. दीड वर्षाहून अधिक काळ होवूनही सिस्टीम युनिट अद्यावत करून न दिल्याने तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल सोलर टेक्नॉलॉजीचे संचालक साहिल मनोज शिंदे (रा.स्वामीनगर ग्राऊंडजवळ मखमलाबादरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सोलर विक्री करणाºया व्यावसायीकाचे नाव आहे.
याबाबत डॉ. सागर सुधाकर नरोडे (रा.श्री तिरूमला आकार अपा.नयनतारा सिटी २ सदगुरूनगर) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. नरोडे यांना आपल्या राहत्या सदनिकेसाठी सोलर सिस्टीम बसवायची होती. त्यामुळे त्यांनी मार्च २०२४ मध्ये संशयिताची भेट घेतली होती.
संशयिताने इमारतीची पाहणी केली असता या ठिकाणी सोसायटीतील चंद्रदिप रघुवंशी यांनीही त्यांच्या सदनिकेसाठी सोलर सिस्टीम बसविण्याची तयारी दर्शविली. यावेळी दोन्ही फ्लॅटसाठी सोलर सिस्टीम युनिट अद्यावत करण्यासाठी व्यवहार होवून दोन लाख ५ हजार रूपयांचे टोकन देण्यात आले.
मात्र संशयिताने दीड पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही सोलर सिस्टीम अद्यावत करून दिली नाही. त्यामुळे डॉ.नरोडे आणि रघुवंशी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रोंदळे करीत आहेत.
बंटी बबलीचा कारनामा
बलात्काराच्या गुह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत भाडेकरूंनी घरमालकाकडे दहा लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. भेदरलेल्या वृध्द घरमालकाने पोलीसात धाव घेतल्याने हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बंटी बबली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिबु अन्थोनी जोसेफ व प्रियंका अतुल सोनवणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अशोक केशवराव ढुबे (६३ रा. दोनवाडे पो.विंचूर दळवी ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
शेती व्यवसाय करणाºया ढुबे यांचा उपनगर परिसरातील संघमित्रा सोसायटीतील दत्तप्रसाद इमारतीत सदनिका आहे. ही सदनिका संशयित बंटी बबलीस भाडेतत्वावर देण्यात आली होती. करार संपल्याने ढुबे यांनी संशयितांना घर खाली करण्याबाबत सांगितल्याने हा प्रकार घडला.
वेळोवेळी सांगूनही संशयित घर खाली करून देत नसल्याने गेल्या २३ आॅगष्ट रोजी ढुबे यांनी संशयिताची भेट घेतली असता शिबू जोसेफ यांना फ्लॅट बळकविण्याच्या इराद्याने फ्लॅट खाली करून पाहिजे असल्यास दहा लाख रूपयांची खंडणी मागितली.
यावेळी संशयिताने महिलेवर बलात्कार केल्याच्या खोट्या गुह्यात अडकवून जेलमध्ये सडवेल तसेच तिच्या पंटरकडून तुझा गेम करून टाकू अशी धमकी दिल्याने ढुबे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
नाशिक शहरात दोघांची आत्महत्या
नाशिक शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळ््या भागात राहणाºया दोघांनी रविवारी (दि.२६) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
अंबड येथील रविंद्र भिमराव बर्डे (३४ रा.मारूती संकुल, दत्तनगर) या युवकाने रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच स्थानिकांनी त्यास तात्काळ बेशुध्द अवस्थेत जिल्हारूग्णालयात दाखल केले.
मात्र वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.
दुसरा प्रकार पळसे ता.जि.नाशिक येथे घडला. आप्पा सिताराम सस्ते (५६ रा.कृष्ण मंदिराजवळ, फुलेनगर) यांनी रविवारी अज्ञात कारणातून दारूच्या नशेत आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता.
मुलगा मयुर सस्ते यांने त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.







