नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोयता घेवून फिरणाऱ्या भंगार दुकानदारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून धारदार कोयता हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने केली.
नदीम रफीक शेख (३२ रा.हरी मंजील,द्वारका ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताचे रासबिहारी रोडवरील मानेनगर भागात एस.बी.ट्रेडर्स नावाचे भंगार दुकान असून तो सोमवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास परिसरात कोयता घेवून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून धारदार कोयता हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस शिपाई दिनेश धकाते यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,अंमलदार मंगल गुंजाळ,दादाजी पवार,राजेश सावकार,सुनिल आडके,कैलास चव्हाण,प्रदिप ठाकरे,दिनेश धकाते,संदिप आंबरे,बाळासाहेब सोनकांबळे,सचिन पाटील आदींच्या पथकाने केली.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1645775702917255169?s=20
Nashik Crime Scrap Shop Owner Arrested