नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर येथील विधाते गल्लीतील महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा उलगडा झाला आहे. ही घटना घडल्यानंतर ही आत्महत्या की हत्या याचा शोध पोलिस घेत होते. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह दहा जणांना ताब्यात घेतले आहे.
विधाते गल्लीत राहत्या घरात अशोक्तीबाई बैग यांची सोमवारी गळा चिरून हत्या करण्यात आली. ही महिला मुळची मध्यप्रदेश येथील आहे. या घटनेची माहिती नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी तसेच सातपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या पतीसह १० ते १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या महिलेचा पती खासगी कारखान्यात कामाला असून तिच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे.
ताब्यात घेतलेल्या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. पतीनेच हत्या केल्याचा संशय आहे. त्याने ही हत्या का केली आणि कशी केली याविषयी मोठा उलगडा होण्याची चिन्हे आहेत.