घोटी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घोटी-सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी कॉलेज समोर रात्री गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाकडून दोन तरुणांना जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. इगतपुरीच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तो पुन्हा मॉब लिन्चिंगची घटना घडली आहे. या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण हा गंभीर जखमी झाल्याची वृत्त आहे.
आफान अन्सारी (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुर्ला येथे राहणारे हे दोघे तरुण चारचाकी गाडीतून मांस घेऊन जात असताना ही घटना घडली. या प्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. इगतपुरी येथे घडलेल्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच घोटी परिसरात पुन्हा एकदा मॉब लिन्चिंगची घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं
घोटी-सिन्नर महामार्गावर एसएमबीटी कॉलेजच्या परिसरात ही घडना घडली आहे. गोमांस तस्करीच्या संशयावरून शनिवारी रात्रीच्या सुमारा जमावाने दोन तरुणांना जबर मारहाण केली. या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे तरुण आपल्या चारचाकी गाडीतून मांस घेऊन जात होते. त्याचवेळी ही घटना घडली आहे. या घटनेत आफान अन्सारी (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दोघेही तरुण मुंबईच्या कुर्ला येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी घोटी पोलिस अधिक तपास करीत आहेत.