नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओमकारनगर भागात भरधाव बुलेटने दिलेल्या धडकेत सहा वर्षीय बालक ठार झाल्याची घटना घडली. अर्णव रोशन भाबड (रा. सुप्रभा बंगलो, ओमकारनगर) असे मृत बालकाचे नाव आहे. दरम्यान संशयित बुलेट चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अर्णव हा बालक शनिवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास आपल्या बंगल्यासमोरील रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. ओमकारनगर कडून पेठरोडच्या दिशेने भरधाव जाणा-या बुलेट (एमएच १५ डीडब्ल्यू ८८००) दुचाकीने त्यास जोरदार धडक दिली.
चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात अर्णव गंभीर जखमी झाल्याने चुलते राकेश भाबड यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास उपचारापूर्वी मृत घोषीत केले.
Nashik Crime Road Accident Child Death