नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिका भरतीच्या पेपरला डमी विद्यार्थी आढळून आल्यानंतर उपनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डमी विद्यार्थ्यांने प्रतिबंधीत इलेक्ट्रीक डिव्हाईसचा वापर केल्याचेही समोर आले आहे. राहूल मोहन नागलोभ, अर्जुन हारसिंग महेर व अर्जुन रामधन राजपूत (रा. सर्व हनुमान मंदिराजळ रामेश्वरवाडी, खेडगाव ता.जि. औरंगाबाद) अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी नाना जयवंत मोरे (रा.सदगुरूनगर, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे. रविवारी (दि.२८) लिपीक सह अन्य पदांसाठी वेगवेगळया परिक्षा केंद्रावर परिक्षा पार पडली. शहरातील आर्टिलरी सेंटर रोडवरील जैन भवन भागातील युको बँकेच्या वर फ्युचरटेक सोल्युशन येथे ही परिक्षा होती.
या केंद्रात अर्जुन महेर हा परिक्षार्थी प्रतिबंधीत इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसचा वापर करतांना आढळून आला. संशयिताच्या चौकशीत तो राहूल नागलोभ याच्या जागेवर बेकायदा परिक्षा देत असल्याचे समोर आले. त्याने प्रवेश पत्रावर बनावट साक्षरी केली होती. तसेच, त्याने परिक्षा केंद्रात प्रवेश मिळविल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात त्यास संशयित अर्जुन राजपूत याने परिक्षास्थळी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस दिल्याचे निदर्सनास आले आहे. तिघांविरूध्द फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणा-या गैर प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम ७.८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा संशियांपैकी एकास पोलिसांनी त्याब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.