नाशिक – नवीन पंडीत कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ७० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन शशिकांत अमृतकार (रा.मखमलाबाद) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अमृतकार यांच्या नवीन पंडित कॉलनीतील लेन नं.२ येथील शशिविकास बंगल्यात ही घरफोडी झाली. दि.४ ते २२ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याच्या गॅलेरीतून टेरेसवर चढून जात ही चोरी केली. टेरेसचा दरवाजा तोडून बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली ७० हजार रूपयांची रोकड,सोन्याचांदीचे दागिणे, मनगटी घड्याळ,महत्वाचे कागदपत्र, संगणकाची हार्डडिक्स तसेच पेनड्राईव्ह असा सुमारे ३ लाख ५५ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बस्ते करीत आहेत.
….
मद्याच्या नशेत एकाची आत्महत्या
नाशिक – मद्याच्या नशेत एकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील विजयनगर भागात घडली. मृत तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र यशवंत खैरणार (३८ रा.माताजी चौक,विजयनगर) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे. खैरणार यास दारूचे व्यसन होते. गुरूवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास त्याने अज्ञात कारणातून मद्याच्या नशेत विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियानी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अदिक तपास हवालदार शेख करीत आहेत.