नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी अंबड सातपूर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
औद्योगीक वसाहतीतील हाफिज रशिद मन्सुरी (रा.संजीवनगर,अंबड लिंकरोड चुंचाळे शिवार) यांची ज्युपीटर एमएच १५ केबी ६८४१ मोटारसायकल गेल्या शुक्रवारी (दि.२२) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी घटना सातपूर औद्योगीक वसाहतीत घडली. याबाबत अशोक रामदास सपकाळे (रा.जाधव संकुल अशोकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सपकाळे यांची स्प्लेंडर एमएच १९ डीएफ ४२६० मंगळवारी (दि.२६) रात्री महिंद्र कंपनीच्या मटेरियल गेट भागातील पार्किंगमध्ये लावलेली असताना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हपास उपनिरीक्षक शिवराम खांडवी करीत आहेत.
तिसरी घटना डावखरवाडी भागात घडली. राजेंद्र म्हाळुजी कुंदे (रा. पावन हौ.सोसा.डावखरवाडी सदगुरूनगर नाशिकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुंदे यांची एमएच १५ जीबी ८४३८ गेल्या मंगळवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेजवळ करीत आहेत.